‘अश्रुफुलांचा अभिषेक करिते विरहिणीची प्रीती । ढळेल शांती पुजारिणीची कळस गोपुरी नसता ।।’
‘अश्रुफुलांचा अभिषेक करिते विरहिणीची प्रीती । ढळेल शांती पुजारिणीची कळस गोपुरी नसता ।।’
१९१४ (४ जुलै): गोटखिंडी (ता. तासगाव, जि. सांगली) येथे निवृत्ती पाटील यांचा जन्म.
१९२०: चुलते रावजी यांनी दत्तक घेतले; दत्तकपिता निधनानंतर पुन्हा मूळ घरी.
१९२०–१९२८: येडेनिपाणी–गोटखिंडी येथे ग्रामीण बालपण. आई भागीरथीबाईंच्या ओव्या, भारुडे, अभंग यांमधून काव्यसंस्कार.
१९२८: तासगाव हायस्कूलमध्ये प्रवेश. मित्र विठ्ठल पागे यांनी ‘सावळ्या’ हे टोपणनाव दिले.
१९३०: सातारा सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश (६ वी).
१९३०–१९३५: सातवी ते मॅट्रिक पर्यंत राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथे शिक्षण.
१९३५: मॅट्रिक उत्तीर्ण.
१९३५–१९३७: प्रिन्स शिवाजी विद्यालय, कोल्हापूर येथे शिक्षकाची नोकरी (कौटुंबिक जबाबदारी सांभाळत पुढील शिक्षणासाठी तयारी).
१९३७: राजाराम कॉलेज, कोल्हापूरमध्ये प्रवेश. प्रा. माधव ज्युलियन, ना.सी. फडके, द.सी. पंगू यांचे मार्गदर्शन. कविता लेखनाची सशक्त सुरुवात.
१९३९: ‘काळा गुलाब’ कविता लोकप्रिय; ‘पी. सावळाराम’ नावाने लेखन.
१९४१: आर्थिक अडचणींमुळे अभ्यासात खंड; साताऱ्यात शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
१९४२ (मार्च): विनायक जाधव यांच्या घरी भेट; कृष्णाबाई जाधव यांच्याशी विवाह ठरला.
१९४२: राजाराम कॉलेजमध्ये बी.ए.च्या शेवटच्या वर्षासाठी पुनरागमन.
१९४३: बी.ए. परीक्षा उत्तीर्ण. कृष्णाबाईंशी विवाह.
१९४४ (२४ जुलै): मुलगी प्रतिभाचा जन्म.
१९४४: ठाणे येथे स्थलांतर; ‘संताजी शिबिरा’त वास्तव.
१९४९: ‘गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का?’ ध्वनिमुद्रिकेची निर्मिती
१९४९: ‘गंगा-जमुना’ या गीताच्या यशानंतर सावळारामांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ गीतलेखनाला प्रारंभ केला.
१९५०: ‘रामराम पाव्हणं’ या चित्रपटासाठी चित्रगीत लिहिण्याची प्रथमच संधी मिळाली. हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला.
१९५० (११ मे): मुलगा संजय जन्म.
१९५३ (४ डिसेंबर): मुलगा राजीव जन्म.
१९६२: ‘पुत्र व्हावा ऐसा’ या चित्रपटाचे प्रथमतः कथालेखन.
१९६२: ठाणे नगरपालिकेच्या ‘नगरसेवक’ निवडणुकीत विजय.
१९६३: ठाणे महापालिका शिक्षण समितीचे सभापती म्हणून निवड.
१९६३ (१४ मे): मुलगी प्रतिभाचा आंतरजातीय प्रेमविवाह. सुरुवातीच्या नाराजीवर मात करून सावळारामांनी मुलीला स्वीकारले.
१९६३: वडील आबाजी यांचे निधन.
१९६६: ठाणे महानगरपालिका नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी. एक वर्षाचा कार्यकाळ.
१९६८ (१३ ऑक्टोबर): परममित्र वसंत प्रभूंचं अकाली निधन
१९६९: ‘नांदायला जाते’ या सावळारामांच्या चित्रपटाची निर्मिती.
१९७४: भाऊ हिंदुराव (अप्पा) यांना स्वातंत्र्यवीर ताम्रपत्र; सावळाराम कुटुंबासह उपस्थित.
१९७७ (२१ जानेवारी): दुसरी मुलगी डॉ. कल्पना हिचा डॉ. सुचील पाठारे यांच्याशी धूमधडाक्यात विवाह. चित्रपट–राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
१९७८ (१ जानेवारी): पुत्र संजयचा विवाह धूमधडाक्यात साजरा.
१९८०: ‘भालू’ हा चित्रपट सावळारामांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी गीतरचनेच्या क्षेत्रातून निवृत्ती पत्करली.
१९८०: ‘ज्ञानसाधना महाविद्यालयाची’. स्थापनेत सावळारामांची महत्त्वाची भूमिका
१९८२ (३१ मे): धाकटा मुलगा राजीव याचा विवाह.
१९८६ (१० फेब्रुवारी): जावई डॉ. सुचील पाठारे यांचा अपघाती मृत्यू. मुलगी आणि नातवंडांना सावळारामांचा मोठा मानसिक आधार.
१९८९: ठाणे महापालिकेतर्फे अमृतमहोत्सवी सत्कार.
१९९०–१९९७: निवृत्तीचा शांत काळ. ज्ञानेश्वरी वाचन, ठाणे रंगायतन कट्ट्यावर मैफिली, मित्रमंडळींशी गप्पा. साधेपणा, विनयशीलता आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व कायम.
१९९७ (१७ डिसेंबर): प्रकृती ढासळल्याने ‘अंकुर हॉस्पिटल’ (ठाणे) येथे भरती.
१९९७ (२१ डिसेंबर, सकाळी ६ वा.): हृदयविकाराच्या झटक्याने पी. सावळारामांचे निधन. मराठी गीतसृष्टीतील अमर अध्याय संपला.